Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबिरात 46 रुग्णांची तपासणी

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामीण भागात अनेक रुग्ण दातांच्या आजाराने त्रस्त असतात परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना उपचार घेता येत नाहीत. या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काटी येथील समर्थ डेंटल क्लिनिक व समर्थ डेंटल केअर ॲन्ड सीबीसीटी सेंटर वैराग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिरास काटीसह परिसरातील दातांच्या आजाराने त्रस्त रुग्णांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 46 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या दंत  आरोग्य तपासणी शिबिरात तज्ञ डॉ. शितल बोराडे, डॉ. प्रशांत भालेराव,डॉ. प्राजक्ता कांबळे यांनी रुग्णांवर मोफत उपचार व मार्गदर्शन केले.

या मोफत दंत आरोग्य शिबिराचा शुभारंभ येथील उद्योजक अहमद पठाण व गुलजार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी उद्योजक अहमद पठाण, गुलजार काझी, श्रीकांत गाटे, गुलजार काझी, डॉ. शितल बोराडे, डॉ. प्रशांत भालेराव,डॉ. प्राजक्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments