Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सफाई कामगारांना रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने हॅन्डग्लोजचे वाटप

मुरुम /प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथे सफाई कामगारांना रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी (ता. १) रोजी सफाई कामगांराना हॅन्डग्लोज (हातमोजे) रोटरीचे अध्यक्ष मुख्याध्यापक कमलाकर मोटे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, सचिव सुनिल राठोड यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर मोटे होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. महेश स्वामी, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, शिवकुमार स्वामी, प्रा. राजकुमार वाकडे, कोषाध्यक्ष प्रकाश रोडगे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. भूषण पाताळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दयानंद कुंभार, गोपी राठोड, राजेंद्र कापसे यांनी पुढाकार घेतला. यावेळी रतन कटके, धोंडीराम राठोड, संगप्पा गायकवाड, हुसेन कोळी, निखिल कांबळे, संजय कोळी, पंकज कांबळे, सचिन कोळी, सुनिल गायकवाड आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नितीन डागा यांनी सफाई कामगार आणि आरोग्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोप कमलाकर मोटे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनिल राठोड यांनी मानले.            
             
 मुरूम, ता. उमरगा येथील नगर परिषदेच्या सभागृहात सफाई कामगारांना हॅन्डग्लोजचे वाटप करताना उमाकांत देशपांडे, कमलाकर मोटे, सुनिल राठोड, नितीन डागा, महेश मोटे, आप्पासाहेब सूर्यवंशी व अन्य

Post a Comment

0 Comments