Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता येथील भीमनगरमधून  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य अशी विश्वरत्न,महामानव क्रांतीसुर्य, परमपूज्य, बोधिसत्व, आधुनिक भारताचे पाहिले कायदेमंत्री, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची भव्य दिव्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात, निळ्या रंगाची मुक्त उधळण व नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. 

प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भारतीय जनता माथाडी पार्टी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक  जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे, माजी सरपंच आदेश कोळी, मिलिंद बनसोडे, शाहू बनसोडे, मकरंद  देशमुख, अनिल गुंड, ग्रामपंचायत  सदस्य अनिल बनसोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी निघालेल्या या मिरवणुकीत आकर्षक रोषणाई केलेल्या रथामध्ये बसवलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून  घेत होती.

मागील अनेक वर्षापासून येथील भिमनगरमधून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघत असते. या भव्य दिव्य मिरवणुकीत काटीसह परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायी रेकॉर्ड तोड गर्दी करून डी.जेच्या तालावर "जय भीमचं नाव जगी गाजत"...! "भीमाचं गाणं डीजेला वाजत"...! भिमगीतावर भीमसैनिकांसह तरुणाईने बेभान होऊन नृत्यामध्ये तल्लीन होऊन भिमगीतावर गीतांवर ठेका धरला.

या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचा शेवट भिमनगरमध्ये  करण्यात आला. तामलवाडी पोलिस प्रशासनाने अतिउत्तम प्रकारे मिरवणूक सांभाळून मिरवणूक शांततेच्या मार्गाने संपन्न झाली.

या मिरवणुकीत भारतीय जनता माथाडी पार्टी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक  जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी सरपंच आदेश कोळी, मिलिंद बनसोडे, शाहू बनसोडे,धनाजी ढगे, अनिल गुंड, मकरंद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे, भोलेनाथ  बनसोडे, नागेश जाधव, दशरथ बनसोडे, दलित मित्र नंदू बनसोडे, नागेश बनसोडे, राजु भोसले, अप्पा बनसोडे, भिमराव घोंगडे, धनराज बनसोडे, रोहन बनसोडे, सचिन बनसोडे, वंदेश बनसोडे, दत्ता बनसोडे, दिलीप बनसोडे, आनंद डोळसे, बंडू सरवदे, दयानंद डोळसे, विशाल चव्हाण, विशाल मस्के, जितेंद्र बनसोडे, सुरज बनसोडे, अनुरथ बनसोडे, भिमा बनसोडे, विकी सोनवणे, यशपाल घोंगडे, संतोष सरवदे, सुरेश बनसोडे, संदेश चंदनशिवे, आकाश मस्के, राजेंद्र सोनवणे, धर्मा ओव्हाळ, पिंटू बनसोडे, सयाजी बनसोडे, अंकित बनसोडे, सोमनाथ भोसले, दिपक भोसले, शैलेश भोसले, बाबासाहेब जाधव, करण बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे आदींसह महिला व शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments