काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील अतिशय सामान्य मागासवर्गीय कुटुंबातील कु. अश्विनी नामदेव कांबळे हिने (पी.एस.पी. एम.एम.एच.एम.सी.) वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर येथून
बीएचएमएस ही पदवी प्राप्त करत आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. अश्विनीच्या वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने तिची आई ताई कांबळे हिने शेतात मोलमजुरी करुन मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावला.मुलगी अश्विनी हिनेही आपल्या आईच्या कष्टाचे चीज करत आईचे मुलगी डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करीत तिचे स्वप्न सत्यात उतरले आहे. या तिच्या यशाबद्दल विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता माथाडी पार्टी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे, मिलिंद बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे व दादा बेग यांच्या हस्ते अश्विनी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील उषा लक्ष्मण सोनवणे हिनेही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जी.एन.एम. ही पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे, मिलिंद बनसोडे, अनिल बनसोडे, दादा बेग, शाहू बनसोडे, जितेंद्र बनसोडे, ताई कांबळे,भोलेनाथ बनसोडे, नागेश बनसोडे, दलित मित्र नंदू बनसोडे,अमोल बनसोडे, दशरथ बनसोडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments