Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील जयदेव म्हमाणे यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेसाठी भारत देशाकडून पंच म्हणून निवड

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील रहिवासी व सध्या  पुण्यात वास्तव्यास असलेले जयदेव घनश्याम म्हमाणे यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी यांच्यामार्फत उझबेकिस्तान येथे 9 मे 20 मे या कालावधीत आशिया निवड चाचणी स्पर्धेसाठी भारताकडून पंच म्हणून निवड करण्यात आली आले. ही निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली असून पंच म्हणून निवड झालेले ते भारतातील एकमेव खेळाडू आहेत. म्हमाणे यांनी नुकत्याच रियाध (सौदी अरेबिया) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत पंच म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे ही निवड झाली आहे. 
        
युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अंतर्गत पँक्रेशेन क्रीडा प्रकारात स्पर्धा होतात. 9 मे 20 मे 2024 या कालावधीत  उझबेकिस्तान येथे होणाऱ्या  स्पर्धेमध्ये पँक्रेशेन, याक्रीडा प्रकारात   घेण्यात  येणार आहेत. या स्पर्धेसाठी जगभरातून सोळा देशातून प्रत्येकी एक पंच निवडण्यात आला आहे. भारतातर्फे या खेळात जयदेव म्हमाने यांची निवड झाली आहे. यापूर्वी 2013 साली वर्ल्ड कॉम्बॅट गेम्समध्ये सेंट पीटर्सबर्ग (रशिया) येथे खेळविण्यात आल्या होत्या. यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि यूडब्ल्यूडब्ल्यू एशियाला ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रॅशन करीता,ऑलंपिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता प्राप्त आहे.आयटीडब्ल्यू पीएफआयओसीच्या मान्यतेने वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2013 सेंट पीटर्सबर्ग,रशिया येथे  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या संरक्षणाखाली झालेल्या खेळांमध्ये भाग घेत त्या स्पर्धांत जयदेव म्हमाणे यांनी आशिया खंडाचे नेतृत्व करण्याचा  बहुमान मिळविला तर तब्बल 10 वर्षानी पंच म्हणून निवड झालेले ते एकमेव खेळाडू आहे. 
     
उझबेकिस्तान मध्ये होणाऱ्या आशिया निवड चाचणी स्पर्धेमध्ये पंच म्हणून जयदेव म्हमाने यांची  निवड  झाल्याने धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments