Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीच्या हर्षल राऊतचे दहावी परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवत यश

काटी/उमाजी  गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल सोमवार दि.27 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. या परिक्षेत काटी येथील रहिवासी तथा अभिनव इंग्लिश स्कूल भानू नगर धाराशिव या प्रशालेचा विद्यार्थी हर्षल धनंजय राऊत या विद्यार्थ्यांने जिद्द आणि कष्टाच्या बळावर 96.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. हर्षल यास विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इतर विषयात सुध्दा हर्षलने कौतुकास्पद गुण प्राप्त केले आहेत. हर्षलचे वडिल धनंजय अभिमान राऊत हे धाराशिव येथे पोलीस मुख्यालयात हवालदार पदावर काम सेवा बजावत आहेत.

हर्षल राऊत मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments