Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील येडेश्वरी प्रशालेची यशाची परंपरा यंदाही कायम; येडेश्वरी प्रशालेचा 100 टक्के निकाल

काटी/उमाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल 2024मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 में रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परिक्षेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, येडेश्वरी कन्या प्रशालेने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम राखत प्रशालेचा 100 टक्के  निकाल लागला आहे.  

प्रशालेतील यशस्वी  विद्यार्थी,विद्यार्थीनींचे ग्रामस्थामधून कौतुक केले जात आहे.  या प्रशालेतून एकूण 65 विद्यार्थी  परिक्षेसाठी बसले होते.यामध्ये प्रथम क्रमांक चि. अथर्व जांबुवंत म्हेत्रे 95.20%, द्वितीय क्रमांक कु.श्रुष्टी सुहास साळुंखे 92.60.%, तृतीय क्रमांक कु.समीक्षा उमेश सावंत 90.40%, तर चतुर्थ कु. क्रांती ज्योतीराम चवळे 90% या विद्यार्थ्यांनींनी यश पटकावत प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचे  47 विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांनी संस्था व येडेश्वरी प्रशालेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे,संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री महेश माने, संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनायक पाटील,शालेय शिक्षण समितीचे चेअरमन श्री शिवदास चटके,प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर. बनसोडे 
सहशिक्षक सुनिल खेंदाड,सहशिक्षक दिगंबर कदम, उमाकांत कदम, गणेश गुंगे,तुकाराम गवळी शिक्षकेतर कर्मचारी दास जी.एस. श्रीमती.चंदनशिवे.एन. एस.यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशालेची यशस्वी परंपरा कायम राखल्याबद्दल  यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थीनींचे  कौतुक व अभिनंदन केले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments