येणेगूर/प्रतिनिधी
कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा इयत्ता दहावीचा निकाल 94.25% लागला आहे. या निकालात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.यशाची उज्वल परंपरा शाळेने कायम राखली आहे.यावर्षी परीक्षेसाठी शाळेतून 87 विद्यार्थी बसले होते. यात विशेष प्राविण्य 48 प्रथम श्रेणी, 29 द्वितीय श्रेणी,04तृतीय श्रेणीत 01विद्यार्थी असे एकूण 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून प्रथम व्हनाळे शुभम बसवराज 94.20%,द्वितीय कु.पाटील धानेश्वरी संभाजी 93.80, तृतीय कु.घोरपडे अनुराधा गोविंद 93.40%, व कु.पोतदार संन्मती संतोष 93.40%गुण मिळविले यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव माननीय बी ए बिराजदार,संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार,उपाध्यक्ष व्हनाळे,संचालक शंकर हुळमजगे, संचालक आनंदराज बिराजदार,वर्गशिक्षक शंकर हुळमजगे महेश खंडाळकर प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हारके,यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थाने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 Comments