Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोकसभेतील मुलाच्या यशासाठी राधाकृष्ण विखेंचे आई तुळजाभवानीकडे साकडे

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 
नगर लाेकसभा मतदारसंघाचे उमेदवार महसूल  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजिव डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या यशासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभेच्या निकालाच्या पुर्वसंध्येला सोमवार दि. 3 रोजी सकाळी साडेतीन पीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन घेत मुलगा सुजयच्या यशासाठी साकडे घातले.

हेलिकाॅप्टरने केलेल्या या दाैऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी होत्या.कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले आणि  मातेची साडी-चोळीची पूजा बांधली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवॉरियर मराठवाडा सह समन्वयक ॲड. अनिल काळे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी धाराशिव जिल्ह्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.  यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती जाणून घेत याबाबत आपण यावर समिती नेमून तात्काळ अहवाल मागवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी ॲड. अनिल काळे व सेवा निवृत्त सनदी अधिकारी डॉ. प्रवीणसिंह परदेशी व भाजपचे पदाधिकारी यांच्या समवेत एक बैठक झाली असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवॉरियर मराठवाडा सह समन्वयक ॲड. अनिल काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, प्रदेश  कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विकास मलबा, शांताराम पेंदे, युवा तालुका सरचिटणीस सागर पारडे, महादेव  रोचकरी, पाराजी देवकर, अमित मोगरकर आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड,तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments