काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 5 रोजी सकाळी येथील धनगर गल्लीतील जय मल्हार तरुण मंडळातील तरुणांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद देत 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाची विशेष बाब म्हणजे सर्व धर्म समभावाच्या भावनेने सर्व धर्माच्या तरूणांनी सहभाग घेतला होता.
रक्तदान शिबीराच्या उद्घघाटन प्रसंगी जय मल्हार तरुण मंडळाचे प्रमुख माजी सरपंच शामराव आगलावे, सरपंच सुजित हंगरकर, उपसरपंच जुबेर शेख. ग्रा.सदस्य अमोल गावडे, मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर मदने, नामदेव आगलावे,बबलू गावडे, नारायण आगलावे, भारत मदने, शेखर माने, नितीन आगलावे, समाधान आगलावे, दादाराव आगलावे, बापू मदने, सुजित आगलावे, धनाजी आगलावे, दिगंबर क्षिरसागर, अनिल गावडे, भरत काळे,पुरुषोत्तम गाडेकर, इमरान फकीर आदी मान्यवरांसह जय मल्हार तरुण मंडळातील सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments