Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचाय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार दि. 6 रोजी सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी लोकनियुक्त सरपंच आशाताई सुजित हंगरगेकर यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत शिव छत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालया समोर भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. 

 यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, पत्रकार उमाजी गायकवाड, रामेश्वर लाडुळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे, बाळासाहेब शिंदे, नानासाहेब सोनवणे, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, अनिल बनसोडे, सविता बनसोडे, संतोष धायगुडे, मधुकर वीर, चंद्रकांत घडमोडे, दत्ता राऊत, विलास सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments