Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे वादळीवाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे राऊत यांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान; तर विज पडून हणमंत म्हेत्रे यांच्या बैलाचा मृत्यू


काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी अभिमान यशवंत राऊत यांच्या शेतातील दुपारी साडेतीन वाजता आलेल्या अवघ्या वीस मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे गट नंबर 513 मधील जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या गोठ्यात चार म्हशी बांधलेल्या होत्या. वरचे पत्रे जवळपास 100 फुटांपर्यंत उडून गेले तर समोरील पत्रे कोलमडून खाली पडले.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली झाली नाही. तसेच येथील शेतकरी हणमंत कुंडलिक म्हेत्रे यांच्या शेतात बांधलेल्या दोन बैलापैकी एक बैलावर विज पडून एका बैलाचा जागेवरच मृत्यू झाला. हणमंत म्हेत्रे यांनी मागील महिन्यातच दिड लाखांची एक बैलजोडी खरेदी केली होती. त्यामुळे त्यांचे 75000 रुपयांचे नुकसान झाले आहे.


जनावराच्या गोठ्याच्या झालेल्या नुकसानीचा व बैलाच्या मृत्यमुळे झालेल्या नुकसानीचा 
पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राऊत व म्हेत्रे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक 
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments