काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे वीज पडून म्हशीचा मृत्यू झाला. गुरुवार दि. 6 रोजी दुपारी 3:30 वाजनेच्या सुमारास वारे, वादळ व विजांच्या कडकडाटसह जोराचा पाऊस झाला. केमवाडी येथील शेतकरी महादेव होनमाने यांचा उदरनिर्वाह म्हशींच्या दूधावर होता. होनमाने यांच्या कडे दोन म्हशीं व गाई अशी दुप्ती जनावरे होती. निवारा म्हणून झाडाला म्हशी व गाई बांधल्या होत्या. परंतु मोठा प्रमाणात विजांचा कडकडाट व पाऊस पडत असल्यामुळे जनावरे निवाऱ्यासाठी घरामध्ये बांधण्यासाठी एक-एक करुन नेऊन बांधत होते. तोच पाठीमागे दूध देणारी व चार महिन्याची गाभण 80 ते 90 हजार रुपये किमतीची असलेल्या म्हशीवर वीज पडली व ती जागीच ठार झाली. यावेळी झाडावर निवाऱ्यासाठी बसलेल्या आठ ते दहा पक्षांचा ही मृत्यू झाला.
या घटनेबाबत केमवाडी गावात नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते आहे. म्हशीचा नैसर्गिक अपघाती मृत्यू झाल्यामुळे होनमाने कुटुंबीयांच्या उदरनिर्वावर संकट कोसळले. शासन दरबारी मदत मिळावी असे होनमाने कुटुंबाकडून मागणी केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
9923005236
0 Comments