Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 4205 मतांचे मताधिक्य; काटीसह परिसरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य ; महायुतीमधील भाजपच्या मातब्बरांच्या जिल्हा परिषद गटातच मशालीला मताधिक्य

      खासदार ओमप्रकाश राजेराजेनिंबाळकर 

काटी/उमाजी  गायकवाड 
धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास  आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून तब्बल 4205 मतांचे मताधिक्य मिळाले.  या गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 8874 मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना 4669 मते मिळाली. काटी जिल्हा परिषद गटात काटीसह सावरगाव, वडगाव (काटी), वाणेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मधील खुंटेवाडी, वाणेवाडी, सावंतवाडी क्रमांक 1 व 2, नरसिंह लमान तांडा, दहिवडी, पांगरदरवाडी, केमवाडी, गवळेवाडी, गंजेवाडी, जळकोटवाडी या गावांचा समावेश होतो. या संपूर्ण गावातून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मताधिक्य मिळाले आहे.

         खासदार ओमप्रकाश राजेराजेनिंबाळकर 

ओमप्रकाश राजेनिंबाळकर व अर्चनाताई पाटील यांना मिळालेले मते याप्रमाणे वाणेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ओमराजे निंबाळकर यांना 694 मते तर अर्चनाताई पाटील यांना 630 मते या ठिकाणी 64 मतांची लिड, काटी येथून ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना 2122 मते तर अर्चनाताई पाटील यांना 1152,  मते, काटी येथे 970 मतांचे मताधिक्य,  दहिवडी मधून ओमप्रकाशना 618 तर अर्चनाताई पाटील यांना 308 मते, दहिवडी येथे 310 मतांचे मताधिक्य , पांगरदरवाडी मधून ओमप्रकाशना 775 मते तर अर्चनाताई पाटील यांना 367 मते, पांगरदरवाडी येथे 408 मतांचे मताधिक्य, सावरगाव मधून ओमप्रकाशना 1922 मते  तर अर्चनाताई पाटील यांना 1106 मते, सावरगाव येथे 816 मतांचे मताधिक्य, केमवाडीतून ओमप्रकाशना 948 मते तर अर्चनाताई पाटील यांना 237 मते, केमवाडी येथे 711 मतांचे मताधिक्य,गवळेवाडी मधून ओमप्रकाशना 142 मते तर अर्चनाताई पाटील यांना 100 मते, गवळेवाडी येथे 42 मतांचे मताधिक्य, वडगाव (काटी) येथून ओमप्रकाशना 837 मते तर अर्चनाताई पाटील यांना 354 मते, वडगाव (काटी) येथे 483 मतांचे मताधिक्य, जळकोटवाडी मधून ओमप्रकाशना 331 मते तर अर्चनाताई पाटील यांना 107 मते, जळकोटवाडी येथे 224 मतांचे मताधिक्य, गंजेवाडी येथून ओमप्रकाशना 485 मते तर अर्चनाताई पाटील यांना 308 मते, गंजेवाडी येथे 177 मतांचे मताधिक्य मिळाले  आहे.

           खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर 
धाराशिव लोकसभेतील 8 आमदार मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ.ज्ञानराज चौगुले,आ.अभिमन्यू पवार, आ. राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज्य संस्था आमदार सुरेश अण्णा धस, यांच्यासह माजी खासदार, माजी आमदार व इतर पक्षातून आलेले स्थानिक मातब्बर नेते या महायुतीतील दिग्गजांना हा महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने मिळालेल्या विजयाने धक्का मानला जात असून त्याच प्रमाणे काटी जिल्हा परिषद गटातील महायुतीमधील मातब्बर भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवॉरियर मराठवाडा सह समन्वयक ॲड.अनिल काळे,भाजपचे  जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,आदेश कोळी,भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, 
वाणेवाडीचे सरपंच महादेव जाधव यांच्या  जिल्हा परिषद गटातील सर्व गावातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मताधिक्य मिळाल्याने हा त्यांच्यासाठी सुध्दा धक्का मानला जात आहे.

धाराशिव लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेराजेनिंबाळकर यांना महाराष्ट्रातून दोन नंबर क्रमांकाची सर्वाधिक 3 लाख 29 हजार 846 विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला तर  या निवडणुकीच्या माध्यमातून तुळजापूर विधानसभेचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मात्र महापराभवाचा  सामना करावा लागला. त्यामुळे काटी जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

          काटीतील कार्यकर्यांचा आनंदोत्सव 

यावेळी सरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, रामेश्वर लाडुळकर,तानाजी हजारे, वसंत हेडे, सुनिल गायकवाड, शिवलिंग घाणे, ग्रामपंचायत सदस्य भैरी काळे आदींसह जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments