Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सांगलीचे नवनिर्वाचित खासदार मा.विशाल पाटील यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापूर:- सांगलीचे नवनिर्वाचित खासदार मा.विशालजी पाटील यांनी मंगळवार दि. 18 जून रोजी तुळजापूर येथे निवडणुकी नंतर प्रथमच श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माजी मंत्री  मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या अणदूर येथील निवास्थानी भेट देऊन स्नेहभोजन घेतले.

अणदूर येथे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांनी नूतन खासदार विशालजी पाटील यांचा सत्कार करून पुढील राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुराव चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे महासचिव मा. अभिजित (भैय्या) चव्हाण, युवा नेते रणवीर (दादा) चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments