Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीसह परिसरात समाधान कारक पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला, बळीराजा पेरणीसाठी सज्ज

काटी/उमाजी  गायकवाड
यंदा पाऊस चांगला होणार या आशेने तुळजापूर  तालुक्यातील काटीसह परिसरातील बहुतेक शेतकरी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर सुरु होईल आशेवर बसले असतानाच   जुनच्या दुसऱ्याच आठवड्यात शुक्रवार  व शनिवार या दोन  दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वेळेवर समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील  बळीराजा चांगलाच सुखावला आहे.

यंदा सोयाबीन पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी  शेतकऱ्यांना आशा असून शेतकरी बीभरण घेण्यासाठी धावाधाव करीत असल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिल्यास काटीसह परिसरातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक 
Only न्युज तुळजापूर 
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments