Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार नवले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार

प्रतिनिधी/तुळजापूर 
 मुख्याध्यापक विजयकुमार नवले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवले यांचा गुणगौरव करणारी भाषणे केली. 

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवले ३२ वर्षांचा सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. नवले यांचा निवृत्ती निमित्त भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी युवा नेते ऋषिकेश मगर यांचा प्रमुख उपस्थितीत झालेल्या सत्कार सोहळ्याला ग्रंथमित्र वसंतराव सूर्यवंशी, मावाजिनाथ महाराज, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, व्यंकटराव पाटील, श्रीकृष्ण सूर्यवंशी, श्रीमंतराव करडे, मुख्यध्यापिका श्रीमती रेखा कुलकर्णी आदि मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक नवले यांनी नरेंद्र बोरगांवकर विद्यालय देवकुरळी,इंदिरा गांधी विद्यालय गंधोरा, मधुकरराव चव्हाण विदयालय केमवाडी,  छत्रपती शिवाजी विद्यालय पिंपळा व अहिल्यादेवी होळकर विदयालय कार्ला आदी शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. 
 
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह आजी माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments