मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व मेळावा क्र. २ बुधवार दि.19 रोजी घेण्यात आला. उपक्रमाच्या अनुषंगाने मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले गेले. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर रकान्यात भरण्यात आल्या.
सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे नोंदणी (रजिस्ट्रेशन), शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी आदी बाबी पडताळून पाहिल्या गेल्या. या वर्षी प्रवेशाचे उद्दिष्ट १० होते. त्यापैकी १३ जणांचे प्रवेश निश्चित झाले असून आणखीन प्रवेश होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे भुसनी केंद्राचे केंद्रप्रमुख एम. एस. माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल मडमे, सहशिक्षक सुनिल राठोड, युवराज चव्हाण,बालाजी भालेराव,रंजना तांदळे आदींनी परिश्रम घेतले.
बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत मेळाव्याप्रसंगी शिक्षकवृंद, पालक यांच्याकडून बालकांना पुस्तक वाटप करताना
0 Comments