Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेत खुंटेवाडीतील विराज जाधवचे यश

             ----विराज मोहन जाधव, खुंटेवाडी 

काटी/उमाजी गायकवाड
उत्तम शिक्षणासाठी देशातील सैनिक स्कूल ओळखल्या जातात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा,शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल्सची स्थापना करण्यात आली  असून राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे 8 जानेवारी 2024 ला ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी प्रवेश परिक्षा झाली होती. 

अतिशय कठीण असलेल्या या परिक्षेत तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील उद्योजक मोहन जाधव यांचे चिरंजीव विराज मोहन जाधव याने घवघवीत यश मिळवत 300 पैकी 234 गुण मिळवून इयत्ता सहावीसाठी सांगली येथील इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. विराजने पाचवी मध्ये अर्णव इंग्लिश स्कूल वैराग शिक्षण घेतले तर पंढरपूर येथील आय.कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी जादा तासिका लावल्या होत्या. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

त्याला सहशिक्षक विवेक भोसले, समीर सर, नवनाथ देशमुख, देशमुख मॅडम, सुमंत मॅडम, खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक जाधव यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments