काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सयाजीराव विजयसिंह देशमुख यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांनी कॉंग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील कॉंग्रेस कार्यालयात त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पत्रात कॉंग्रेसची ध्येयधोरणे, विचार, कॉंग्रेसचे कार्य ग्रामीण भागातील लोकांपर्यंत व कॉंग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी धाराशिव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज (भैय्या) पाटील व कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्या हस्ते माजी अमित देशमुख यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज भैय्या पाटील, तालुकाध्यक्ष रामचंद्र (आबा) आलुरे, जुबेर शेख, प्रदीप साळुंके, चंद्रकांत काटे, भैरीनाथ काळे, प्रकाश गाटे, रामहरी लोंढे, तानाजी हजारे, आबा गाढवे आदी मान्यवरांसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सयाजीराव देशमुख हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.त्यांनी संजय गांधी निराधार योजना कमिटीची सदस्यपद, सोसायटी चेअरमनपद भुषविले असून ते सध्या कुलस्वामिनी सहकारी सुतमीलचे विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments