Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वाणेवाडी दारफळ रस्त्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून 60 लाखांचा निधी मंजूर

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापर तालुक्यातील वाणेवाडी ते दारफळ रस्त्याची प्रचंड दुरवस्था असून या मार्गावरुन वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमातूनही "काटी -दारफळ रस्त्याची दुरवस्थे बद्दल वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृताची दखल घेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, वाणेवाडीचे सरपंच महादेव जाधव, लिंबराज शिनगारे, हरि सावंत, चंदू लोके, सुमित घोडके, रविंद्र बामणकर, पोपट शिनगारे, बाबा शेळके यांनी तुळजापूर विधानसभेचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेकडे पाठपुरावा केला होता.

आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेतली व त्यांच्या शिफारशी वरुन सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत 50/54 योजनेच्या  माध्यमातून 60 लाखांचा निधी मंजूर झाला असून यापैकी 35 लाखांच्या निधीचे टेंडर मंजूर झाले असून 25 लाखांच्या निधीची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याची भाजपचे कार्यकर्ते महादेव जाधव यांनी दिली आहे.

तसेच काटी-खुंटेवाडी ते धामणगाव रस्त्यासाठीही जिल्हा  परिषद सार्वत्रिक बांधकाम विभाग अंतर्गत 50/54 योजनेतून 60 लाखांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 30 लाखांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन्ही कामे महिनाभरात सुरु होतील त्याच बरोबर काटी -खुटेवाडी धामणगाव 5/500 पुर्ण रस्ता होण्यासाठी  आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरीसाठी शासनाकडे शिफारस केली आहे अशीही माहिती महादेव जाधव यांनी दिली आहे. काटी ते दारफळ आणि काटी ते धामणगाव रस्त्या होणार असल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments