काटी/ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व कुलस्वामिनी सहकारी सुतमीलचे संचालक सयाजीराव विजयसिंह देशमुख (मालक) यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवार दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या वतीने येथील ग्रामपंचायत कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्काराने सन्मान करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांच्या हस्ते लातूर येथील कॉंग्रेस कार्यालयात सयाजीराव देशमुख यांना सोमवारी जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले आहे.
वाढदिवसानिमित्त सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांचा सत्कार
या कार्यक्रमात सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव परिवाराच्या वतीने सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव कुटुंबियांच्या वतीने अशोक जाधव यांच्या हस्ते कॉंग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
पत्रकार उमाजी गायकवाड व गायकवाड परिवाराच्या सत्कार
कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार उमाजी गायकवाड व गायकवाड परिवाराच्या वतीने सयाजीराव देशमुख यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या तर सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित (भैय्या) हंगरगेकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रदीप साळुंके, माजी सरपंच शामराव आगलावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तुळजापूर विधानसभा परिषदेचे उपाध्यक्ष वसंत हेडे, प्रकाश सोनवणे, प्रकाश गाटे, विकास हंगरकर, चंद्रकांत काटे, अमोल गावडे, शिवलिंग घाणे, नाबाजी ढगे, माजी सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष थिटे, आबा गाडवे, कालु कुरेशी, राजाभाऊ स्वामी, अमर स्वामी, दत्ता छबिले, देवव्रत खपाले, सचिन शिंदे, प्रशांत सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments