Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गोरगरीब गरजू माणसाला नजरेत ठेऊन प्रशासकीय सेवा बजावली---- हरिभाऊ बागडे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव सोहळा

                   
मुरूम/ प्रा.सुधीर पंचगल्ले
राजकुमार सागर यांच्या सोबतीने विधानसभा अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात उत्तम प्रकारचे कार्य त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये असताना ज्या खोलीत राहुन शिकले. ती जागा ज्या व्यक्तीच्या मालकीची होती. त्याने ती जागा जेंव्हा विकायची ठरवली. त्यावेळी लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी ती  संपूर्ण इमारत महाराष्ट्राने विकत घ्यावी, असे सांगितले. परंतु राज्य सरकारला इतर देशातील जागा विकत घेणे नियमबाह्य असल्याने भारत सरकारने ती जागा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकत घेऊन भारतीयांच प्रेरणास्थान या हेतूने ते सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवले. 

लंडनमधील त्या प्रेरणास्थानी मी, सागर व काही सहकारी जावून भेट दिली होती. सागर हे गोरगरीब गरजू माणसाला नजरेत ठेऊन प्रशासकीय सेवा बजावल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. मुरूम येथील श्रीराम मंगल कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवानिवृत्तीबद्ल त्यांच्या मित्र परिवाराकडून आयोजित त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात शनिवारी (ता. २७) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते. प्रमुख अतिथी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, बिदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश बदोले, सिद्धार्थ भालेराव, दामूअण्णा, सागर यांच्या सौभाग्यवती वंदाराणी सागर, पिताश्री मंगेश व मातोश्री कस्तुरबाई सागर, पदमाकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, माधवराव पाटील यांनी काढलेल्या शाळेचे राजकुमार सागर हे विद्यार्थी आहेत. याचा मला अभिमान वाटतो. मुरुमच्या मातीतून असे हिरे घडले याचा मुरुमकर म्हणून आनंद होतो आहे. मुळात मुरूमच्या मातीचा हा गुणधर्मच आहे. राज्यात असे विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण अधिकारी काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सत्काराला उत्तर देताना राजकुमार सागर म्हणाले की, मी या सेवा गौरव समितीचा ऋणी आहे. ज्यांनी अतिशय सुंदर आयोजन केले. मी उपस्थितांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. पुढील काळात देखील सेवाभावीवृत्तीने समाजकार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. दशरथ भांडे, मधुकरराव चव्हाण, ज्ञानराज चौगुले, गिरीश बदोले, अनिस अहमद, अजय देडे, मदन गायकवाड, अरविंद चौधरी, मंदार वैद्य, प्रा. किरण सगर, राजेश सुरवसे, राहूल गायकवाड आदींनी मनोगतपर भावना व्यक्त केल्या. शिवानंद बोळशेट्टे, प्रा. आण्णाराव कांबळे, किरण गायकवाड, प्रा. अभिजीत अंबर, शंभुलिंग पाटील, शिवराज पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार आदींसह गौरव समितीने पुढाकार घेतला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मिणीयार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल धनगर तर आभार श्यामसुंदर सुरवसे यांनी मानले. शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.       
                   
 मुरुम, ता. उमरगा येथील राजकुमार सागर यांच्या कार्यगौरव सत्काराप्रसंगी बसवराज पाटील, हरिभाऊ बागडे, ज्ञानराज चौगुले, मधुकर चव्हाण, अनिस अहमद दशरथ भांडे व अन्य

Post a Comment

0 Comments