Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज---राहुल गायकवाडअनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत वृक्षारोपण

मुरुम/प्रतिनिधी
वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याकरिता वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले. मुरूमच्या विठ्ठलसाई कारखाना परिसरातील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रारंभी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, मुंबईचे उपजिल्हाधिकारी श्यामसुंदर सुरवसे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, नायब तहसीलदार  सिद्धार्थ धलकर, प्रशांत बारलावर यांच्या हस्ते शनिवारी (ता. २७) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड होते. यावेळी उमरगाचे विस्तार अधिकारी अजित भांगे, जिंदाल ग्रुप मुंबईचे राजकुमार येवलेकर, समुपदेशक अभय भालेराव, आप्पासाहेब मुंडासे, खंडाप्पा धुम्मा, महेश कोळी, पवन कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना राहूल गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अधिक वाचन, लेखन, चिंतन करावे. मनाच्या शुद्धतेसाठी दररोज योगा-ध्यानधारणा करावी. अभ्यास करत असताना अवांतर वाचन वृत्तपत्रे, महापुरुषांचे आत्मचरित्र, त्यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथ,  विविध प्रकारचे लेख वाचावेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या सेवासुविधा बाबत माहिती जाणून घेतली. 
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सुरवसे, उत्तम राठोड, अमोल कांबळे, सचिन फुगटे, प्रदिप झिंगाडे, अभिजीत काळे, विनोद कांबळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार लखन इनकर यांनी मानले.             
    
मुरूम, ता. उमरगा येथील शासकीय निवासी विद्यालयात वृक्षारोपण करताना राहुल गायकवाड, श्यामसुंदर सुरवसे, महादेव किरवले, सिद्धार्थ धलकर, प्रशांत बारलावर व अन्य

Post a Comment

0 Comments