मुरूम/प्रतिनिधी
येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या प्राचार्य महानंदा रोडगे, प्रा. डॉ. रमाकांत पाटील, सहशिक्षक कांत सोमवंशी, शिवानंद पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेकडून सेवापूर्ती सत्कार सोहळा बुधवारी (ता. ३१) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी उमरगाचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे मानद अध्यक्ष एम. डी. देशमुख, अध्यक्ष सुरेश टेकाळे, पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, कोथळीचे सरपंच आप्पासाहेब पाटील, सुनिल पुजारी, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, देवेंद्र कंटेकुरे, दत्ता चटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बापूराव पाटील यांच्या हस्ते महानंदा रोडगे, रमाकांत पाटील, कांत सोमवंशी, शिवानंद पाटील यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एम. डी. देशमुख, महानंदा रोडगे, रमाकांत पाटील, शिवानंद पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. कल्याणी टोपगे, प्रा. विश्वजित अंबर, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. उमाकांत महामुनी, विवेकानंद पडसाळगे, अमोल गायकवाड, शोभा पटवारी, रेखा उन्नद आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास घुरघुरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. करबसप्पा ब्याळे तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षकवृंद, नागरिक उपस्थित होते.
यावेळी शिवकुमार बिराजदार म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात काळानुरूप तंत्र कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आल्याने विद्यार्थी अधिकाधिक स्वावलंबी बनणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व आवडीनिवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. या संस्थेने येथील कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिल्याने गुणात्मक व दर्जात्मक विद्यार्थी घडविले आहेत. सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक क्षेत्रात शिक्षकांनी योगदान द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
0 Comments