Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव ते गवळेवाडी रस्त्याची दयनीय अवस्था; वाहन धारकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

 
काटी/उमाजी गायकवाड
गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा हद्दीच्या शेवटच्या टोकाला असलेले तुळजापूर  तालुक्यातील सावरगाव ते गवळेवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.हा रस्ता वडाळा येथील सोलापूर- बार्शी रस्त्याला जोडला असून. वडाळा या ठिकाण शैक्षणिक संकुलने व व्यवहारीक बाजारपेठ असून तुळजापूर  तालुक्यातील सुरतगाव, सावरगाव, जळकोटवाडी, केमवाडी, गवळेवाडी व काटी येथून शालेय विद्यार्थ्यी व नागरिक वडाळा या ठिकाणी ये-जा करतात. परंतु रस्ता खड्ड्यात आहे की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. रस्त्यामध्ये दोन ते अडीच फुटाचे खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी, वाहनधारक यांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतो. रस्त्या बाबत नागरिकांनी स्थानिकचे प्रतिनिधी, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही या  दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे.


लेखी निवेदने देऊनही रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 
"अनेक वेळा या रस्त्याबाबत लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु स्थानिकचे प्रतिनिधी, आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी या रस्त्याबाबत दखल घेत नाही."
 धनंजय काशीद
नागरिक केमवाडी ता.तुळजापूर 

एसटी फेऱ्या होत नसल्याने शैक्षणिक नुकसान 
"सावरगावाहून वडाळा या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज एसटीने ये-जा करते. एखाद्या वेळेस मोठा पाऊस पडला की रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यात  पाणी साठते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे."
 कु.संगीता कांबळे, 
विद्यार्थीनी सावरगाव ता. तुळजापूर सांगत होती.

मनस्तापामुळे नागरिक त्रस्त
"ऐन पावसाळ्यात सावरगाव ते गवळेवाडी रस्त्यांवरून वाहनाने जाताना वाहनांच्या चाकांमुळे रोडवरील डबक्यांमधील गढूळ पाणी व चिखल अंगावर उडत असल्याने कपडे खराब होत आहेत. तर नवीन प्रवाशांची मोठी हेळसांड होत असून, याच खड्ड्यांमधून मार्ग काढताना अपघात  होत आहेत. या रस्त्याबाबत गावातील नागरिकांनी आवाज उठवला परंतु याबाबत कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.भविष्यात अनर्थ टाळण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा."
                    सचिन सुनिल काळे
स्थानिक युवक केमवाडी ता. तुळजापूर

Post a Comment

0 Comments