Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वाडी (बामणी) येथे मराठा योध्दा मनोज (दादा) जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळे वाटप

धाराशिव:- धाराशिव जिल्ह्यातील वाडी (बामणी) येथे गुरुवार दि.1ऑगस्ट रोजी सकाळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व मराठा योद्धा श्री. मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजाई विद्यालय वाडी (बामणी) येथील जि.प.शाळा,अंगणवाडीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  विद्यार्थ्याना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेंद्र पाटील होते. यावेळी उपसरपंच अमर माने,दिपक टकले,संजय पारवे,समाधान माने,प्रथ्वीराज मोटे,शाहूराज मोटे,मिटू शिंदे,अंकुश शिंदे यांच्यामार्फत विद्यार्थ्याना फळे वाटप  करण्यात आले.  

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपसरपंच अमर माने यांनी विद्यार्थ्याना लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगून मराठा योध्दा मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या विषयी सांगताना म्हणाले की, मनोज जरांगे यांना लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असल्याने ते नेहमी सामाजिक चळवळीत राहत होते.जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले… मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख निर्माण  झाल्याचे सांगून पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज दादा यांची ख्याती निर्माण झाल्याचे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायेत. आंदोलने करणे हा मनोज दादा यांचा स्थायीभाव असल्याचे सांगून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सहशिक्षक जामगावकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments