Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील कुलस्वामिनी सोसायटीत स्वखर्चाने निलेश व रामचंद्र रोचकरी बंधूंनी बगिचा मध्ये बाकडे व लाईटची व्यवस्था; रोचकरी बंधूंचे माणुसकीचे दर्शन

    सोसायटीमधील सदस्य सत्कार करताना....

तुळजापूर/प्रतिनिधी 
तुळजापूर शहरातील नळदुर्ग  रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील कुलस्वामिनी हॉसिंग सोसायटीमधील बगीच्यात सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी या दोन्ही बंधूंनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वखर्चाने बसण्यासाठी चार बाकडे व लाईटची व्यवस्था करीत  मानुसकीचे  दर्शन घडविले.

तसेच  त्यांनी कॉलनीत फिरुन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी खराब झालेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचे व अंधारमय भागात लाईटचे  फोकस बल्ब बसविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी नागरिकांना दिले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सोसायटीच्या वतीने सोसायटीमधील  सदस्यांच्या उपस्थितीत श्रीनाथ मंगल कार्यालय ऑफिसमध्ये रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले.

सोसायटीच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
--युवा नेते रामचंद्र (आबा )रोचकरी 

यावेळी सोसायटीमधील नागरिकांशी सुसंवाद साधताना युवा नेते रामचंद्र (आबा) रोचकरी  म्हणाले की, कुलस्वामिनी सोसायटीमधील काही समस्या असतील तर त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. सोसायटी मधील नागरिकांच्या समस्या आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.

यावेळी श्रीनाथ मंगल कार्यालयाचे गणेश पुजारी,
पत्रकार अनिल आगलावे, पत्रकार उमाजी गायकवाड, राहुल जाधव,कुमार क्षिरसागर, हरिदास (बापू) नाईकवाडी, लक्ष्मण चौधरी,आबा पुजारी, मोहन शिंदे, सुरज लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार अनिल आगलावे व उमाजी गायकवाड शुभेच्छा देताना....

Post a Comment

0 Comments