Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रा. कल्लय्या रुद्रय्या स्वामी यांची गुंजोटी येथील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी निवड

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील रहिवासी असलेले व गुंजोटी येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्था संचलित श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणारे प्रा. कल्लय्या रुद्रय्या स्वामी यांची  नुकतीच उपप्राचार्य पदी निवड झाली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे उपप्राचार्य माधव माने नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने उपप्राचार्य पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी प्रा. कल्लय्या स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा संस्था सचिव डॉ. दामोदर पतंगे, अध्यक्षा श्रीमती विभावरीताई शाईवाले, उपाध्यक्ष प्रभाकर हिरवे, संचालक संगय्या स्वामी, संचालिका श्रीमती वैशालीताई कदेरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, सेवानिवृत्त प्राचार्य गोरख घोडके, सेवानिवृत्त उपप्राचार्य माधव माने, सेवानिवृत्त सहशिक्षक रत्नाकर पतंगे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता गायकवाड, सहशिक्षक अभयकुमार हिरास आदींनी सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments