Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मुरूम शहरात लाडकी बहीण योजनेचा शिवसेनेकडून सुविधा केंद्राचा शुभारंभ

मुरुम/प्रतिनिधी
 उमरगा तालुक्यातील मुरुम  येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मुरूम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. ८) रोजी सुविधा केंद्राचा शुभारंभ तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

 या योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या शहरातील सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे यांनी या योजनेबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की, महायुती सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.

शहरातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. या योजनेतून एकही महिला लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी किंवा कागदपत्रे भरून देण्यासाठी महिलांकडे कोणीही पैसे मागत असेल तर राज्य शासन कठोर निर्णय घेत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याकरिता  शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम महायुती सरकार करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही महिलेला एक रुपयाचाही खर्च करण्याची गरज नाही. या योजनेसाठी रेशनकार्ड आणि जन्माचा किंवा शाळेचा दाखला असेल तर उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे महिलांनी तणाव घेऊन कागदपत्रे मिळविण्यासाठी कुठेही धावाधाव करण्याची आवश्यकता नाही. महिलांना कागदपत्रांची अडचण निर्माण होऊ नये. यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यात या योजनेचे सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहेत, असे सांगून सर्वच पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना यांनी सांगितले की, मुरूम शहरात राहणाऱ्या महिलांना लाभ मिळावा म्हणून सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून या सुविधा केंद्रात योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मोफत भरून घेण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख व्यंकट पाटील, शिवशरण वरनाळे, शरणप्पा मुदकण्णा, सुरेश मंगरुळे, अमृत वरनाळे, राजेंद्र शिंदे, प्रशांत मुदकण्णा, जमीर शिकलगर, व्यंकट चौधरी, शंकर टेकाळे, संतोष मुदकण्णा, संजय सावंत, राजेंद्र कारभारी, श्रीधर इंगळे, पुष्पराज शिंदे, श्रावण इंगळे आदींसह अनेक शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी असणाऱ्या माता भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संतोष मुदकण्णा, श्रावण इंगळे यांनी परिश्रम घेतले.              

 मुरुम, ता. उमरगा येथे शिवाजी चौकात सुविधा केंद्राचा शुभारंभ तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे यांच्या हस्ते करताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य.

Post a Comment

0 Comments