Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीतील काझी सय्यद हमीदोद्दीन बरतर अहमद यांची महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा परीक्षेत यश; नगर अभियंतापदी निवड

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील काझी सय्यद हमीदोद्दीन  बरतर अहमद यांनी महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा आयोगामार्फत नोव्हेंबर  2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र  राज्यात 73 व्या रॅंकने घवघवीत यश संपादन केले असून त्यांची नगरविकास खात्यामार्फत प्रशासकीय  सेवेत नगर अभियंता (स्थापत्य) श्रेणी ब,पदी निवड झाली आहे. त्याच बरोबर त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत भारत सरकारमध्ये कनिष्ठ अभियंता केंद्रीय  जल आयोगामध्येही त्यांची निवड झालेली आहे. या दोन्ही पदापैकी  महाराष्ट्र नगरपरिषदेतील प्रशासकीय सेवेत नगर अभियंता पदावर राहण्यासाठी त्यांनी पसंती दर्शविली आहे. त्यांचे थोरले बंधू सुजातअली काझी हे महाराष्ट्र शासनाच्या जल संधारण विभागात धाराशिव येथे राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या निवडीबद्दल काटीसह परिसरातून काझी सय्यद हमीदोद्दीन बरतर अहमद यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments