Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मुरूम शहराच्या विकासासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजुर; आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

मुरूम/प्रतिनिधी
 शहरातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ३ कोटी रूपये निधी मंजुर झाल्याची माहिती आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. विविध विकास  कामांना मंजुरी मिळविण्याकरिता ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करीत होते. यामुळे शहरातील किसान चौक येथे सभामंडप बांधकाम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे २० लाख रूपये, किसान चौकातील काम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे २० लाख, भवानी मंदिराच्या सभामंडप बांधकाम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे २० लाख, माऊली मंदिराच्या सभामंडप बांधकाम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे २० लाख, विरशैव कक्कया समाज वस्ती (नेहरु नगर) सामाजिक सभागृह बांधकाम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे ४० लाख, विरशैव कक्कया समाज वस्ती (शिंदे गल्ली) सामाजिक सभागृह बांधकाम व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे २० लाख, राजशेखर मुदकण्णा कॉम्पलेक्स ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजेंद्र कृषी केंद्र दुकानपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुस आरसीसी बंदिस्त नाली, पेव्हर ब्लॉक व इतर अनुषंगिक कामे करणे १ कोटी ६० लाख रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून याबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहेत. शहरातील नागरिकांनी वरील मागणीकरिता अनेक वेळा आमदारांकडे पाठपुरावा केला. त्यांनी विविध विकास कामे मंजूर करुन आणल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments