येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्त अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष कलशेट्टी हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू आहेत.व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशावरून उमरगा तालुका उपप्रमुखपदी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून व नियुक्तीपत्र देऊन शिवसेना पक्षाचे पक्ष निरीक्षक अनंत पताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख बाबुरावन शहापुरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमरगा रणधीर भाऊ पवार, विलासजी व्हटकर, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख प्रमुख विजयकुमार नागणे, शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष रजा अत्तर ,शिवसेना नेते सदाशिव भातागळीकर, शिवसेना शाखाप्रमुख आकाशराजे कांबळे, पवन त्रिमुखे, प्रशांत पोचापुरे आदी उपस्थित होते.
0 Comments