काटी/उमाजी गायकवाड
सोलापूर व धाराशिव जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवरील व तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या पाच दिवस चाललेली नागोबा यात्रा सोमवार दि. 5 आषाढ अमावस्या पासून सुरु झालेली नागोबा यात्रा शुक्रवार दि. 9 नागपंचमी दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत, धार्मिक वातावरणात पार पडली. पाच दिवसांच्या यात्रा कालावधीत जिल्ह्य़ासह परजिल्ह्यतील हजारो भाविकांनी श्री नागोबाचे दर्शन घेतले. दुपारी तीन नंतर पालखी मिरवणूक निघाली. यात्रा कालावधीत विशेष महत्व असणाऱ्या साप, पाल,विंचू या एकमेकांचे कट्टर हाडवैर्यांना एकत्र आल्याचे पहाण्यासाठी धाराशिव, लातूर, सोलापूर जिल्हातील अनेक ठिकाणांहून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटली होती होती. पंचमी दिवशी भाविकांनी दंडवत घालून सुवासिनीनी लाह्या आणि दुध, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून नागपंचमी साजरी केली. सावरगाव येथील नागोबा यात्रा यंदा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत उत्साहात पार पडली.त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत सोमवारी आषाढ अमावस्येदिवशी दुपारी साप, पाल,विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात दगडी शिळेखाली आगमन झाले होते. आजच्या काळात या यात्रेकडे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.
हे तिन्ही प्राणी एकत्रीत सलग पाच दिवस राहिले. सोमवार दि.( 5 ) नागपंचमी दिवशी यात्रेत खरगा, गण,भाकणूक,पालखी मिरवणूक असे विविध धार्मिक पार पडले. गुरुवारी नागोबा यात्रेच्या चौथ्या दिवशी भावाच्या उपवासानिमित्त जवळपास 20 ते 25 हजार महिलांनी नागनाथ मंदिराजवळील वारुळाचे पूजन करुन बहीण -भावाच्या अतूट नात्याचा पांढरा धागा बांधून तेथेच उपवास सोडला. पेढा, मिठाई, उंच पाळणा, खेळण्याची दुकाने यांनी मंदीर परिसर गजबजून गेला होता.
शुक्रवारी नागपंचमी दिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यास व नवसपुर्ती करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी पुजारी सद्गुरू स्वामी यांची मंदीरापासून गण व पालखी मिरवणूकी 3:30 वाजता गाजत, नागनाथाच्या भजन जयघोषात टाळमृदंग, दिमडीच्या निनादात हनुमानकडे निघाली. हनुमान मंदीरात संचार झाल्यानंतर परत गण मिरवणूक नागनाथ मंदिराकडे निघाली असताना ठिकठिकाणी प्रत्येक सुवासिनींनी पाट टाकून व दारात रांगोळी काढून पालखीची पूजा करून दर्शन घेतले. मंदीरात मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांना खरगाची अंगोळ घालण्यात आली. सायंकाळी 6 वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओवाळले गेले. भाकवणूक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली.
भाकवणूक:-ज्वारी, गहू हरभरा, सोयाबीन जास्त पिकेल
मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रम पार पडला. या भाकवणूकीत मानकरी केशव अंबादास डोके यांनी खरीप व रब्बी हंगामातील पिके ठेवली असता मंदीराचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांनी
यंदा गहु ज्वारी, हरभरा व सोयाबीन पिके चांगली येतील व पर्जन्यमान चांगले राहील असे भाकित सांगितले.भाकवणूक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली.
नागनाथ मंदीरातील आकर्षक सजावट व रांगोळीने वेधले लक्ष
नागनाथ मंदिरासमोरील सभामंडपात प्राजक्ता गोरख माळी व तन्वी यशवंत कुलकर्णी या विद्यार्थ्यांनींनी रांगोळीतून आकर्षक व सुंदर शंभू महादेवाची प्रतिमा साकारली होती. ही रांगोळी सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच मंदीरातील नागनाथांच्या मुर्तीस आकर्षक फुलांनी सजावट केल्याने मंदिरातील गाभारा प्रसन्न दिसत होता.
मंदीर परिसरात 200 विविध रोपाची लागवड केल्याबद्दल वायकर यांचा सत्कार
निवृत्ती आबा वायकर यांच्या सौरभ नर्सरी पुणे यांच्या वतीने नागनाथ मंदिर परिसरात 200 विविध रोपांचे वृक्षारोपण केल्याबद्दल यात्रा उत्सव समितीच्या सत्कार करण्यात आला.
यंदा सर्वांचे आकर्षण ठरले पारंपरिक वाद्य व देखावे
नागपंचमी दिवशी मिरवणुकी दरम्यान केरळ राज्यातील पारंपरिक वाद्ये व शिवकालीन व अन्य देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. केरळ मधील चंडा बेलम या पारंपरिक वाद्य वाद्यवृदांनी सादर केलेल्या विविध प्रकारचे नाद वाद्यावर एकापाठोपाठ एक वाजविले जात होते. यंदाच्या यात्रेतील हे अनोखे व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे सादरीकरण भाविकांना पाहयला मिळाले.
भाविकांच्या स्वागतासाठी डिजीटल बॅनर...
या यात्रा कालावधीत भाविकांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी, डिझीटल बॅनरने रस्ते फुलून गेले होते. तर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुवर्णाताई पाटील, उपसरपंच स्वातीताई तोडकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच आनंद बोबडे यांनी भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी परिश्रम घेतले.
भाविकांसाठी सामाजिक उपक्रम
गुरुवारी येथील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय लिंगफोडे, सिध्देश्वर तानवडे, अरविंद गोडसे यांच्या वतीने रविवारी फराळ, हणुमंत गाबणे तर्फे मसाला दुध, तर दोस्ती ग्रुपच्या वतीने केळीचे वाटप, नागनाथ कामगार संघटनेच्या वतीने राजगिरा लाडू, क्लासमेट ग्रुपच्या वतीने थंड पाण्याची सोय करण्यात आली होती.
यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी
भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच आनंद बोबडे, एकनाथ अक्कलकोटे, योगेश काढगावकर, परमेश्वर तानवडे, राहुल अक्कलकोटे, दत्तात्रय लिंगफोडे, आदेश मेंगळे, प्रविण तोडकरी, भगवान लिंगफोडे, अनिल पाटील, तात्या तोडकरी,अथर्व तोडकरी, बाळासाहेब डोके, राहुल तोडकरी,ओंकार अक्कलकोटे, गणेश गाबणे, नवनाथ तानवडे, महादेव तानवडे, एकनाथ लिंगफोडे, रमेश काढगावकर, प्रतिक डोके,दत्ता डोके,योगेश तानवडे,सुरज ढेकणे,विशाल ढेकणे, शिवम स्वामी, सचिन गाबणे, रुद्रा फंड, बजिरंग तानवडे, नवनाथ माने, शुभम अक्कलकोटे, चंद्रकांत गाबणे, हनुमंत गाबणे, हरी बोबडे, अण्णासाहेब तानवडे, ओंकार काढगावकर, काशिनाथ तोडकरी, मानकरी बाळासाहेब तानवडे, रामलिंग गाबणे, विजय तानवडे, नागराज भडंगे, भारत कानवले, गुरलिंग तानवडे, दिनेश कुंभार, आबा डोके, नंदकुमार पाटील,संजय कोळी, आबा भालेकर, रामा भडंगे, विशाल तोडकरी, तात्या तोडकरी, चंद्रकांत गाढवे, विजय तोडकरी, विष्णू डोके, श्रीशैल्य तानवडे, राजेंद्र (बापू) तोडकरी, राहुल कानवले, साकी मानकरी महारुद्र अक्कलकोटे, गणपत तानवडे, दत्ता काढगावकर,राम तानवडे, दादाराव अक्कलकोटे, वैभव तोडकरी, रमेश तानवडे, पिन्टू तानवडे,तम्मा अक्कलकोटे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तसेच तर यात्रेत सुरक्षितता रहावी, यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments