तुळजापूर:- तुळजापूर शहरातील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेकाप कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन सर्वसम्मतीने दोन ठराव घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघ हा पूर्वी शेकापचा बालेकिल्ला होता आणि आजही आहे या अनुषंगाने हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे मागून घेऊन येणारी तुळजापूर विधानसभा शेकापने मोठ्या ताकदीने लढवावी असे ठराव घेण्यात आले. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी
माजी उपनगराध्यक्ष भाई युवराज बापू पवार आणि भाई किरण माणिकराव खपले यांनी उमेदवारीची मागणी कार्यकारणीसमोर केली.
त्या नंतर येणारी न.प.निवडणूक ही पुर्ण ताकदीने लढवावी आणि शेकापचा लाल झेंडा फडविण्यासाठी ताकदीने निवडणुकीत उतरावे असा निर्णय घेण्यात आला.भाई उत्तम अमृतराव यांनी आभार मानून बैठक संपली.
यावेळी भाई युवराज पवार,भा.भालचंद्र अपराध, भा.विलास वेदपाठक,भाई उत्तम(नाना) अमृतराव,भा. कल्याणराव भोसले, भा.मारूती(आण्णा) नाईकवाडी
भाई.श्रेयस कुतवळ, भाई.चंद्रकांत साळुंके आदी
कार्यकरी सदस्य उपस्थित होते.
0 Comments