Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वैभव वाघमोडे हा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

                           
मुरुम/ प्रतिनिधी)
 तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच गुंजोटी येथे पार पडल्या. या स्पर्धेत भारत शिक्षण संस्थेच्या मुरूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव वाघमोडे या स्पर्धकाने ५७ किलो वजन गटातून १९ वर्षाखालील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धकास क्रीडा शिक्षक बालाजी इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले. 

भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सचिव पद्माकर हराळकर, शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक इंगोले, प्राचार्य गोविंद इंगोले आदींनी या स्पर्धकाचे कौतुक व अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.                    
मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील वैभव वाघमोडे हा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम घोषित करताना क्रीडा शिक्षक व अन्य.

Post a Comment

0 Comments