मुरूम/प्रतिनिधी
शहरातील बसस्थानक समोरील लिंगायत स्मशानभूमी ठिकाणातील अतिक्रमण हटवण्यात यावीत, आठवडी बाजार व मुख्य रस्त्यावरील सरकारी जागेवर अतिक्रमण करून मांस विक्री केली जात आहे. सदर दुकानाना इतरत्र जागा द्यावी या यामागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मुरूम नगर परिषदेवर शुक्रवार (ता. ९) रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी निवेदन स्वीकारले. सप्टेंबर अखेर पर्यंत कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. शहरातील बसस्थानकासमोर लिंगायत समाजाची स्मशानभुमी आहे. याठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. यामध्ये चिकण व मटण विक्री दुकाने असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. तसेच छत्रपती शिवाजी चौक ते सरकारी रुग्णालय रस्त्यावरील उत्तर बाजूस मटण विक्री दुकाने आहेत. या दुकानातील टाकाऊ पदार्थ चक्क मुख्य रस्त्यावर उघड्यावर टाकली जातात. याच दुकानासमोर भटकंती कुत्रे वावरत असतात. त्यामुळे येथून जा ये करणाऱ्या महिला व शालेय विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीतून मार्ग काढावा लागत आहे. तसेच आठवडी बाजार ठिकाणी देखील मटण चिकन दुकाने मोठया संख्येने आहेत. यामुळे परिसरात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. अशा सर्व प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तात्काळ कारवाई करा, अशी मागणी मोर्चेकरानी केली. सदर मोर्चा छत्रपती शिवाजी चौकापासून नगर परिषद पर्यंत काढण्यात आला. यादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.
मुरूम, ता. उमरगा येथील नगर परिषदेसमोर हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्चाचे निवेदन स्विकारताना सचिन भुजबळ
0 Comments