Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण

 

मुरूम/प्रतिनिधी
 पारंपारिक शिक्षण प्रणालीबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण पत्रकारिता, अंगणवाडी-बालवाडी सेविका प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, संवाद कौशल्य यासारखे अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक तथा प्रा. डॉ. सतिश शेळके यांनी केले. मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामार्फत ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित मंगळवारी (ता. ६) रोजी ते प्रमुख अतिथी म्हणून  बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. या अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्याचा एकूण निकाल ९६ टक्के लागला. त्यात आनंद देशट्टे व चित्रलेखा स्वामी (प्रथम), सचिन राठोड (द्वितीय), कुमारी मनश्री मोटे (तृतीय) तर अजिंक्य राठोड (चौथा) क्रमांक पटकाविलेल्या व सहभागी  यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शेळके म्हणाले की, पत्रकार हा निर्भीड व रोखठोक असला पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणीतून अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. अशा सर्टिफिकेट कोर्सचा विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.      

अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवून लेखन करावे. त्यांच्या लेखणीतून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा दूर होऊन सजग नागरिक तयार झाले पाहिजे. व्यवसाय व नोकरी करत-करत निरंतर शिक्षण घेऊ शकतात आणि आपले व महाविद्यालयाचे नाव उज्वल करू शकतात. यावेळी समन्वयक डॉ. प्रकाश कुलकर्णी, नहीर मासुलदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ रवींद्र आळंगे, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. रमेश आडे, डॉ. सुजित मटकरी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. दयानंद बिराजदार आदींची उपस्थिती होती. अजिंक्य राठोड, हणमंतप्पा शंके, रिजवान बागवान, शिवानंद पुजारी, हर्ष गायकवाड, प्रभाकर महिंद्रकर आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.                              
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देताना अजिंक्य राठोड यांचा सत्कार करताना प्राचार्य अशोक सपाटे, सतिश शेळके, चंद्रकांत बिराजदार, प्रकाश कुलकर्णी, महेश मोटे व अन्य.

Post a Comment

0 Comments