Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कोळेवाडी चा शेतकरी पुत्र बनला पीएसआय

मुरुम/प्रतिनीधी
 उमरगा तालुक्यातील कोळेवाडी गावचे अल्पभूधारक शेतकरी मच्छिंद्र  पालमपल्ले यांचा मुलगा मोहन पालम पल्ले पोलीस उपनिरीक्षक पीएसआय बनला आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, श्री.विठ्ठल चिकुंद्रे,श्री सिद्धेश्वर माने, श्री.मच्छिंद्र पालमपल्ले,श्री.जीवन पालमपल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. 
 
त्यांचे प्राथमिक शिक्षण कोळेवाडी येथील छोट्याशा गावात झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण रामलिंग मुदगड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथे झाले. त्यांचा हा यशाचा प्रवास दीपस्तंभासारखा दिशा देणारा ठरतो. अद्यावत शैक्षणिक सुविधा,साधने नाहीत, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे, आर्थिक संपन्नता नाही म्हणून हतबल न होता प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मात करता येऊ शकते हे त्यांनी आपल्या यशाद्वारे सिद्ध करून दाखवले आहे.पोलिस खात्यात भरती होणे हे अनेकांचे स्वप्न असते. अंगावर खाकी वर्दी असावी यासाठी आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. आपणही पोलिस होऊन तो मान मिळवावा असे अनेकांना वाटते.  'पीएसआय' पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते.महाविद्यालयीन शिक्षण घेताना मोहन पालम पल्ली यांनी अर अर्धवेळ काम केले, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुंबईमध्ये जाऊन काम करून आपला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेतली.त्यांचा हा संघर्षशील जीवन प्रवास प्रेरणादायी स्वरूपाचा ठरतो.

Post a Comment

0 Comments