Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेस सलग पाचवा विभागीय दिपस्तंभ पुरस्काराने गौरव

    
 मुरुम/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबईच्या वतीने एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर व राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित शनिवारी (ता.३) रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध पतसंस्थांना विभागीय पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सन २०२३-२४ चा मुरुमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे सर्वोत्कृष्ट व दिशादर्शक कार्य केल्याबद्ल १० कोटी ते ५० कोटीच्या दरम्यान झालेला पारदर्शक व्यवहार, वाढते भागभांडवल, विविध योजना, सामाजिक योगदान व वसुली. त्यांच्या या कार्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या हस्ते पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे, आनंदराव बिराजदार आदिंचा आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व मानाचा दुप्पटा देवून मराठवाडा विभागातून पहिला दिपस्तंभ पुरस्कार देवून मान्यवरांनी सन्मानित केले. सदर पतसंस्थेने या अगोदर चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येवून हा पाचवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्यांच्या अविस्मरणीय यशाबद्ल संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वृंद आदिंनी फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.  

                           
 मुरूम, ता. उमरगा, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनकडून विभागीय पुरस्कार देताना ओमप्रकाश कोयटे, मिलिंद काळे, राजश्री पाटील यांच्या हस्ते संस्थेचे शिवशरण वरनाळे, शरणाप्पा मुदकण्णा, कमलाकर जाधव, अशोक जाधव, अमृत वरनाळे व अन्य.

Post a Comment

0 Comments