काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी सणानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी नऊवारी साडी,शालू,इरकल व विविध प्रकारच्या साड्या परिधान करून आल्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सुनिल खेंदाड यांनी सर्व विद्यार्थ्यीनींना गोलाकार उभे केले.
मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी आपले हिंदू सण व उत्सव यांचे महत्त्व व का साजरे करावेत याविषयी माहिती सांगितली. गणेश गुंगे यांनी नागपंचमीची विविध गाणी स्पिकरवर लावली.सर्व विद्यार्थीनींनी फेर धरला, फुगडी , झिम्मा असे विविध खेळ खेळत नागपंचमीचा आनंद लुटला.या कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी सहशिक्षक उमाकांत कदम यांनी आभार मानले.
0 Comments