Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रित्यर्थस्नेहबंध परिवार पिंपळा बुद्रुक तर्फे उद्योजक राम रेड्डींचा सत्कार

काटी/उमाजी गायकवाड
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरकडून नुकताच बालाजी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.डी.राम रेडी यांना नुकताच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल पिंपळा बुद्रुक येथील स्नेहबंध परिवारातर्फे त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला .यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच विजयकुमार जाधव , शाळा समिती अध्यक्ष बालाजी चुंगे,संग्राम राजेपांढरे, विठ्ठल नरवडे, विनोद चुंगे,जोतिबा जाधव मारुती लोहार, शाहीर चौगुले यांनी रोपट्याची भेट व मानाचा फेटा बांधून विशेष सत्कार केला.

उद्योग क्षेत्रात भरारी घेऊन आरोग्य ,शिक्षण , जलसंधारण , क्रीडा या क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान बालाजी परिवाराने दिलं आहे . ग्रामीण व शहरी भागातील सामान्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या  उद्योग समूहाने नेहमीच तत्परता दाखवली आहे .विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक संच,स्मार्ट टीव्ही,स्मार्ट बोर्ड,  प्रोजेक्टर, आर.ओ. मशीन, डेस्क या भौतिक सुविधा शिक्षणासाठी उपलब्ध करून देऊन मुलांचे शिकणे त्यांनी सुकर केले आहे .त्याबरोबरच शाळांना वर्गखोल्या,स्वच्छतागृह बांधणे, पाण्याच्या टाक्या पुरवणे याही बाबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.धाराशिव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण शाळांना कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

बालाजी सरोवर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी श्री राम रेड्डी साहेबांचे सामाजिक योगदान व त्या माध्यमातून सामान्यांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या सत्कार्माचे फळ म्हणजेच हा जीवनगौरव पुरस्कार आहे असे सांगत बालाजी परिवाराने निसर्गाप्रमाणे परोपकाराची जपलेली भावना मानवतेचे आदर्श उदाहरण असल्याचे गौरवोद्गार काढले तसेच उद्योग क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केलेल्या रेड्डी साहेबांनी समाजकार्याचा आदर्श सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे असे सांगितले.

याप्रसंगी प्रसाद सांजेकर ,सचिन मोरे यांची विशेष सहकार्य लाभले.विनोद चुंगे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments