Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी करिअर कट्टा विद्यार्थी संसद--प्राचार्य डॉ. संजय अस्वले

मुरुम/प्रतिनिधी
आजचा युवक दिशाहीन झाला आहे. शिक्षण, करिअर, संस्कार याचा योग्य संवाद साधला जात नाही. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बेरोजगारी आहे पण कौशल्य विकसित केली तर रोजगार आणि स्वयरोजगार मिळू शकतो, यासाठी विद्यार्थी संसदेचे विद्यार्थी सदस्य कार्य करतील, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.

उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा सेंटर ऑफ एक्सेलन्स अंतर्गत विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली. या विद्यार्थी संसदेचे उद्घाटन डॉ. अस्वले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी करिअर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. एस. पी. पसरकले, डॉ. ए. के. कटके यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी गायकवाड निळकंठ, मुख्यमंत्री, सूर्यवंशी पंकज, कौशल्य विकास मंत्री ममाळे प्रसाद, उद्‌योजकता विकास मंत्री चव्हाण प्रज्वल, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, रणाखांव दियाली, नियोजन मंत्री, सेफ इनामदार, कायदा व शिस्तपा‌लन मंत्री मोरे गणेश, माहिती प्रसारण मंत्री चहाण स्नेहा, संसदीय कामकाज मंत्री  शेरखाने सूरज,  सामान्य प्रशासन मंत्री व सर्व विद्यार्थी संसदेचे विद्यार्थी यांनी करिअर कट्टा संसदेची शपथ घेतली आणि कार्यास सुरुवात केली आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. के. कटके सूत्रसंचालन गायकवाड तर आभार प्रदर्शन डॉ. पसरकल्ले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments