मुरुम/सुधीर पंचगल्ले
अतनूर परिसरातील २८ गावे, वाडी, तांडा, वस्तीतून महाराष्ट्राच्या कळसुबाई उच्च शिखरावर पोहोचणारा या परिसरातील वयाच्या ५८ व्या. वर्षी सेवानिवृत्तीनंतर आपलं ध्येय पूर्ण व यशस्वीरित्या पार करून अतनूर च्या संजीवन समाधी स्थळ म्हणून श्री. घाळेप्पा स्वामी महाराज व पंचकोशीत प्रसिद्ध असलेल्या काशीहुन ज्योतिलिंग मुर्ती आणून श्री.काशी विश्वनाथ मंदीरात एकशे पन्नास वर्षांपूर्वी स्थापित मुर्ती रूपी ज्योतिर्लिंगांपैकी असून अतनुरातील हे हेमांडपंथी मंदीर म्हणजेच दुसरे प्रतिपंढरपूर श्री.काशी विश्वनाथ मंदीर होय. याच पवित्र पावन भुमीत जन्म घेऊन महाराष्ट्रातील उच्च शिखर कळसुबाई । शिखर यशस्वी रित्या पार करून दाखल झालेल्या. येथील नुकतेच आपल्या उच्च महाविधालयीन कॉलेज मधून प्रदीर्घ काळ सेवारत सेवानिवृत्त प्राध्यापक उमाकांत नारायणराव जोशी अतनूरकर किरण च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई चा ट्रेक पूर्ण केला आहे.
याबद्दल त्यांचे अतनूर परिसरात तोंड भरून कौतुक केले जात असून अतनूर ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय व श्री.काशी विश्वनाथ मंदीर संस्थानच्या वतीने दि.५ ऑक्टोंबर शनिवार रोजी मंदिराच्या सभागृहात सत्कारही करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, मी. नुकताच प्राध्यापकाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले होतो. माझ्या मनात खूप वर्षापासून ट्रेकिंगला जाण्याची प्रबळ इच्छा होती. पण कामाच्या व्यापामुळे जाऊ शकलो नाही. माझ्या मनात प्रचंड आनंद ओसांडून वाहत होता. माझ्यासोबत अनेक तरुण लोक होती. त्यांच्यासोबत माझी ट्रेकिंग पूर्ण झाली. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटी पासून १६४६ मिटर आहे. शिखरावर जाण्यासाठी मुख्य पायवाट बारी गावातून जाते. या गावातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला एक ओढा लागतो. तो ओलांडून झाल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे नवीन मंदिर लागते. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिर पाहून मनाला खूप आनंद वाटला. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही. त्यांच्या सोयीसाठी ही मंदिर आहे. दुसरी शिडी पार केल्यावर दगडात दोन पावली कोरलेली आहेत , ती कळसुबाईची पावले आहेत. अशी लोकांची श्रद्धा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहीर आहे. विहिरीचे पाणी पिण्यास अत्यंत गोड आहे. अत्यंत शुद्ध स्वरूपात पाणी पिण्यास मिळते. हे पाणी पिल्यानंतर मनाला खूप आनंद झाला. विहिरीच्या जवळच पत्र्याचे शेड आहे. त्या ठिकाणी चहा, भजे, शरबत मिळते. आम्ही त्या ठिकाणी थांबून फ्रेश झालो. प्रवासात एकूण लोखंडाच्या चार शिड्या आहेत. चौथी शिडी पार करून मंदिरापर्यंत पोहोचलो, त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी चार तास लागले. अत्यंत कठीण रस्ता होता, परंतु मनात प्रचंड ऊर्जा असल्यामुळे आम्ही पूर्ण करू शकलो. शिडी पार करताना प्रचंड वारा येत होता. तरीपण आम्ही व्यवस्थित शिखरावर पोहोचलो, त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकविला, राष्ट्रगीत म्हटले. देवीचे दर्शन घेतले. आपण शिकार पोहोचलो याचा मनाला खूप आनंद झाला. परतीच्या प्रवासास चार तास लागले. सकाळी आठ वाजता सुरूच केलेला प्रवास संध्याकाळी सहा वाजता संपला. आम्ही सर्व उत्साही आनंदी होतो. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रवास होता. जय हिंद !जय महाराष्ट्र !
0 Comments