Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना तब्बल 3200 डस्टबीन वाटपाचा शुभारंभ; काटी ग्रामपंचायतचे निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पूढे

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत मार्फत  गावातील कुटुंबांना स्वच्छतेचा वसा घेऊन आपले आणि गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे यासाठी काटी ग्रामपंचायतने एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून   प्रत्येक कुटुंबाला दोन याप्रमाणे तब्बल 3200 डस्टबीन वाटपाचा शुभारंभ शनिवार दि.5 रोजी  मान्यवरांचे उपस्थितीत येथील  न्हावी गल्लीत प्राथनिधीक  स्वरुपात संपन्न झाला.

स्व.आर.आर.पाटील सुंदर गाव योजनेत 2020 -21 या वर्षात वीस लाख रुपयांचे बक्षीस काटी ग्रामपंचायतने पटकावले होते.या रक्कमेतून आठ लाख रुपयेचे डस्टबीन खरेदी करून त्याचे वाटप काटी गावातील 1600 कुटुंबांना 3200 डस्टबीन वाटप केले जाणार आहेत.त्यापैकीच शनिवार दि.5 रोजी न्हावी
 गल्लीत हे डस्टबीन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

 प्रातिनिधिक स्वरूपात डस्टबीनचे वाटप करताना उपस्थित मान्यवर.....

याच रक्कमेतून आठ लाखांची एक घंटा गाडी व गावातील मुख्य चौकात चार लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घंटागाडीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच आशाताई हंगरगेकर यांनी दिली.

काटी ग्रामपंचायतचे निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पुढे
काटी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना तब्बल 3200 डस्टबीन वाटपाचा शुभारंभ; काटी ग्रामपंचायतचे निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पूढे  ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेतून उज्ज्वलता मिळून आरोग्यदायी पिढी निर्माण व्हावी, स्वच्छ भारत अभियानाच्या पुर्णत्वासाठी स्व.आर.आर.पाटील सुंदर गाव योजनेतून मिळालेल्या रक्कमेच्या योगदानातून एक पाऊल पुढे टाकत गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबीनचे वाटप करण्यात येणार आहे.
 --सरपच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर 

यावेळी सरपंच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,उपसरपंच पती चंद्रकांत काटे, ग्रामपंचायत सदस्य जुबेर शेख,प्रकाश सोनवणे, भैरीनाथ काळे, प्रशांत सुरवसे,दत्ता छबिले,सुनिल गायकवाड,भुजंग राऊत,अशोक ताटे,पप्पू मगर,कैलास राऊत,अंगणवाडी कार्यकर्ती साधना राऊत आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments