Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नाझ क्लिनिक बहुतांशी कक्ष नवीन स्थलांतरित जागेत लवकरच रुग्णांच्या सेवेत; जनरल वार्ड, स्पेशल वार्ड, आयसीयू, व्हेंटिलेटर,अतिदक्षता विभाग सुविधा

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील डॉ.कै.युसूफ मुजावर यांचे चिरंजीव डॉ.आसिफ मुजावर, डॉ.अनिस मुजावर व अर्शद मुजावर या डॉक्टर बंधूंचे सुसज्ज "नाझ क्लिनिक" नवीन सुसज्ज स्थलांतरित जागेत लवकरच रुग्णांच्या सेवेत सुरु होत आहे.

 "नाझ क्लिनिक" या नवीन स्थलांतरित जागेत “अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, महिला बाल, प्रसूतीकक्ष, जनरल वार्ड, स्पेशल वार्ड,आयसीयू, व्हेंटिलेटर सुविधा अद्ययावत तयार करण्यात येत आहेत. विविध विभागांची कामे "नाझ क्लिनिक" च्या नवीन जागेतील ओपीडी विभागात येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत  कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

जनरल व स्पेशल वार्डसाठी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आला असून महिनाभरात बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी नाझ क्लिनिकच्या वतीने घेण्यात येणार आहे. 

त्यामुळे या  क्लिनिकचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,व या क्लिनिकचे काम पुर्ण होऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांच्या सेवेत सुरु होणार आहे. असे "नाझ क्लिनिक" चे सर्वेसर्वा डॉ. आसिफ युसुफ मुजावर यांनी सांगितले.


रुग्णांना चांगले उपचार मिळण्याच्या हेतूने स्थलांतरित केलेल्या "नाझ क्लिनिक" मध्ये रुग्णांना उत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments