तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरातील श्रीनाथ मंगल कार्यालयात मंगळवार दि.1 रोजी सायंकाळी 7 वाजता काक्रंबा,सिंदफळ, सलगरा, मंगरुळ,काटी या जिल्हा परिषद गटासह तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार ॲड.धिरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे ओमराजे निंबाळकर यांना जनतेने महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून भरघोस मतांनी विजयी केले. त्याप्रमाणे जनता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घोषणाबाज सरकारला निश्चित धडा शिकवेल व तुळजापूर विधानसभा निवडणुकीत नुसत्या घोषणाबाजी करणाऱ्या भाजप उमेदवाराला पराभूत करुन महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार ॲड.धीरज पाटील यांनी व्यक्त केला.
तुळजापूर येथील निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यास महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.....
पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीत कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी (राष्ट्रवादी शरद पवार गट)व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील युती एकसंघ राहावी यासाठी तुळजापूर विधानसभेत जोडण्यात आलेली 72 गावात, नळदुर्ग शहर व आज तुळजापूर शहरात निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून स्व.आमदार साहेबराव हंगरगेकर, स्व.शिवाजीराव पाटील बाभळगावकर, शेकापचे स्व.माणिकराव खपले, नरेंद्र बोरगांवकर व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तालुक्याचा विकास साधला ही विकासाची वाटचाल अखंडपणे सुरु ठेवणार असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. चालू भाजपच्या आमदारांकडून नुसता घोषणांचा पाऊस असून प्रत्येक्षात अंमलबजावणी मात्र होताना दिसत नसल्याचे सांगितले.चालू भाजपच्या आमदाराने केलेली विकासकामे दाखवावी असा प्रश्न विचारुन ते फक्त अंमलबजावणी न करता नुसत्या घोषणाबाजी करतात. पाच हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगतात मग निधी गेला कुठे याबाबतीत चालू भाजप आमदाराने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. स्व. विलासराव देशमुख यांनी तुळजापूर तीर्थ क्षेत्रासाठी 365 कोटी निधी देऊन लोकांच्या हिताचा विकास आराखडा तयार केला होता. परंतु चालू भाजप आमदारांकडून विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नुसत्या घोषणा होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याबाबत,तुळजापूर शहर विकासबाबत, नळदुर्ग तालुका अप्पर तहसील कार्यालयाबाबतीत असेल परंतु या सर्व घोषणा आहेत. हे सर्व कामे करायची होती तर मागील साडेचार वर्षात काय केले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मी इच्छुक उमेदवार असून मला पक्षाने संधी दिली तर त्या संधीच निश्चितच सोनं करेन अशी ग्वाही देत पक्षाने मला एकदा संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत संधी मिळाली तर लोकांच्या कामी येणाऱ्या तुळजापूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याची स्थानिक व्यापारी, नागरीक, तिन्ही मंडळाचे पुजारी यांना विश्वासात घेऊन तुळजापूर शहरासह तालुक्याचा निश्चितपणे विकास साधणार असल्याचे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर मतदार संघातील काक्रंबा,सिंदफळ,सलगरा, मंगरुळ,काटी या जिल्हा परिषद गटासह तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
तुळजापूर येथे पार पडलेल्या या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यात तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कॉंग्रेस रामचंद्र आलुरे,जेष्ठ नेते माधवराव कुतवळ, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उपतालुकाप्रमुख रुबाब पठाण,शेकापचे तालुकाध्यक्ष उत्तमराव अमृतराव,नागनाथ भांजे, प्रदीप मगर आदी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी या महायुती सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. रोजगाराच्या समस्या वाढत आहेत. केवळ पैसे खाण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर उभा करून विविध योजना आखून भ्रष्टाचाराचा कळस गाठला जात आहे अशी टीका करुन जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाऊन तुळजापूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले तर आभार कॉंग्रेसचे युवा नेते अमोल कुतवळ यांनी मानले.
या मेळाव्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, कॉंग्रेसचे युवा नेते अमोल कुतवळ,राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कॉंग्रेस रामचंद्र आलुरे,जेष्ठ नेते माधवराव कुतवळ, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उपतालुकाप्रमुख तुराब पठाण, शेकापचे तालुकाध्यक्ष उत्तमराव अमृतराव,नागनाथ भांजे, सुतमीलचे संचालक अनिल हंगरगेकर, जेष्ठ नेते कालिदास नवगिरे, संजय देशमुख, सयाजीराव प्रतापराव देशमुख,दिलीप भोकरे, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे,जुबेर शेख, बाळासाहेब शिंदे, बालाजी बंडगर, प्रदीप मगर,नवनाथ जगताप,आनंद उपासे, चेतन बंडगर, सुनिल जाधव, मोहन जाधव,भारत कदम, सुधीर कदम, शिवाजी चुंगे, श्रीकांत धुमाळ, रुबाब पठाण, अनंत घोगरे, तौफिक शेख, पुरुषोत्तम देशमुख, चंद्रकांत काटे, रामहरी लोंढे, धनाजी गायकवाड,मोहन शिंदे, सुनिल परिट, सुनिल गायकवाड यांच्यासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले होते.
0 Comments