Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी कृषी कन्या शुभांगी ढगे यांचा सपत्नीक राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

काटी येथील कृषी कन्या सौ.शुभांगी नाबाजी ढगे यांचा मुंबईत सपत्नीक राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने सन्मान  करण्यात आला.....

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रयोगशील व प्रगतशील  द्राक्ष बागायतदार नाबाजी ढगे यांच्या पत्नी शुभांगी ढगे यांना रविवार दि. 29 रोजी मुंबई येथे वल्लभभाई पटेल स्टेडियम (नॅशनल स्पोर्ट्स  क्लब ऑफ इंडिया (डोम ), वरळी मुंबई ) येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यस्तरीय "जिजामाता कृषिभूषण" 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात जळकोटवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार ब्रम्हदेव महादेव फंड यांना "युवा शेतकरी" पुरस्कार 2022 तर गंजेवाडी येथील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव वसंतराव नाईक शेतीनिष्ठ 2020 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जळकोटवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार ब्रम्हदेव फंड यांचा सपत्नीक युवा शेतकरी पुरस्काराने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले....

राज्यात कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी  करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न,वसंतराव नाईक कृषिभूषण,जिजामाता कृषिभूषण,कृषिभूषण (सेंद्रिय शेती),उद्यान पंडीत,वसंतराव नाईक शेतीमित्र,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी,पीकस्पर्धा विजेते,पद्मश्री. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित आले.

गंजेवाडीतील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले....

राज्य शासनामार्फत सन 2020,2021 व 2022 या वर्षाच्या एकूण 448 पुरस्कार्थींचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे,आमदार विक्रम काळे, भा.प्र.से.च्या कृषी सचिव जयश्री भोज, भा.प्र.से.चे कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे यांची प्रमुख  उपस्थिती होती.

काटीतील कृषी कन्या शुभांगी नाबाजी ढगे यांना जिजामाता कृषिभूषण,जळकोटवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार ब्रम्हदेव महादेव फंड यांना "युवा शेतकरी" पुरस्कार 2022 तर गंजेवाडी येथील द्राक्ष बागायतदार सुदर्शन जाधव वसंतराव नाईक शेतीनिष्ठ 2020  चा पुरस्कार मिळाल्याबद्दल काटीसह जळकोटवाडी, गंजेवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments