मुरुम/प्रतिनिधी
नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शिक्षण महर्षी माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी (ता. ५) रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे समन्वयक डॉ . रविंद्र आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. पायळ अगरकर, प्रा. डॉ. राजाराम निगडे, प्रा. डॉ. मल्लीनाथ बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोरेगाववाडी येथील शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रीकांत गावडे, साक्षी जाधव (प्रथम) रोख १०००१ रुपये, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिक्षा बेंडगे, रेणुका वाकळे (द्वितीय) रोख ७००१ रुपये, नांदेड येथील कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स नितीन कसबे, अजय हानवंते (तृतीय) रोख ५००१ रुपये, मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयाची दिव्या सुर्यवंशी उत्तेजनार्थ रोख २००१ रुपये, माधवराव पाटील कॉलेज फार्मसीचा नबीलाल जमादार उत्तेजनार्थ रोख २००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचा काळ हा स्पर्धात्मक आहे, आणि प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता गाठण्यासाठी झटणं अत्यावश्यक आहे. या स्पर्धात्मक युगात तुमच्यासमोर असलेल्या संधी अमर्याद आहेत, पण त्या प्राप्त करण्यासाठी कष्ट, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न हेच तुमचे खरे शस्त्र आहेत. तुमचं ध्येय ठरवा, त्याच्यासाठी झटत राहा. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण मेहनतीला पर्याय नाही. कधी अपयश आलं तरी त्यात शिकण्याची संधी आहे, हे लक्षात ठेवा. अपयश हीच पुढच्या यशाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रमेश आडे, डॉ. सुजित मटकरी, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. सदाफअलमास मुजावर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. गोपाळ कुलकर्णी यांनी मानले. यावेळी विविध महाविद्यालयाचे स्पर्धक, विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात वाद-विवाद स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सत्कार करताना अशोक सपाटे, मल्लिनाथ बिराजदार, राजाराम निगडे, सतिश शेळके व अन्य.
0 Comments