Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीसह परिसरात सततच्या पावसामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी करुन पिके वाचविण्याचा प्रयत्न

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात सतत पडत  असलेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकास फटका  बसला असून, धुईमुळे कांदा पिकांची वाढ  खुंटली आहे. पिके पिवळी पडली आहे तर  करपा व मर रोग, दावण्या  रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांकडून महागड्या  औषधांची फवारणी करुन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला  जात आहे.

बहुतांश शेतकऱ्यांकडून कांदा पिकाला नगदी पिक म्हणून पाहिले जाते. मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात झालेला पावसामुळे व  दररोज पहाटे पडणारे धुके, दवबिंदू व ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकास बसला असून, करपा व मर रोगाचा व दावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होऊन धोक्यात आले आहे. काही कांदा जमिनीतच सडला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी महागडी औषधे व बुरशीनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काटी परिसरात पाहावयास मिळत आहे.

मागील अनेक दिवसापासून या भागात पावासाच्या संततधार होत आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टीने या भागातील ठिकठिकाणी कांदा पिकामध्ये पाणी साचले असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे पिकांमध्ये मर, पानावरील करपा, पाने पिवळे पडणे इत्यादी अशा अनेक समस्या जाणवत आहेत. जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकास दिलेले खते पिकास उपलब्ध होत नाहीत, परिणामी पिकाची वाढ मंद गतीने होते व खुंटते. जसे कांद्याचे दर लहरीचे असतात अगदी त्याप्रमाणेच यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

काटीसह सावरगाव, केमवाडी, खुंटेवाडी, जवळगाव, वाणेवाडी या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यावर्षी अती प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या भागातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

महागडी औषधे फवारणी करुन कांद्याचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न
अति पाऊस व बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकांना बसला आहे. जास्त पाऊस झाल्याने शेतातील कांदा जमीनतच सडुन गेला आहे. त्यामुळे आता खर्चही वसूल होणार नसल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारुन या भागातील शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
        --नितीन कापसे
     कांदा उत्पादक शेतकरी
             जवळगाव

Post a Comment

0 Comments